Dahi Handi 2022: कोरोनाच्या सावटानंतर देशभरात यंदा दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. काल बीडकरांनी देखील दहीहंडीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होत. या कार्यक्रमाला हरयाणामधील प्रसिद्ध गायिका सपना चौधरी यांना बोलवण्यात आलं होत. सपनाला पाहण्यासाठी तरुणाईने मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमाला शिवसेना आणि भाजप नेत्यांनी हजेरी लावली होती. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आधी मेटेंना श्रद्धांजली आणि मग त्याच स्टेजवर सपना चौधरीचे ठुमके यामुळे मात्र अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर खर्च करुन कार्यक्रम जल्लोषात साजरा केल्याने नेत्यांनी शेतकऱ्यांचे दुःख विसरल्याची टीका काहींनी केली. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात सुरुवातीला दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून सर्वांनी मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ‘तेरे आखो का ये काजल’ या प्रसिद्ध गाण्यावर सपनाने ठुमके लगावले, बीडकरांनी या गाण्याला दाद दिली. आधी मेटेंना श्रद्धांजली आणि मग त्याच स्टेजवर सपना चौधरीचे ठुमके यामुळे मात्र अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
Previous Articleमच्छे येथे रस्ता रोको
Next Article खानापूर-अनमोड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात








