वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सुरक्षेत वाढ केली गेली आहे. गांगुलीला आधीपासून वाय श्रेणीच्या सुरक्षा आहे. आता यात वाढ करून त्यांची सुरक्षा झेड श्रेणीची केली गेली आहे. बंगाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. गांगुली सध्या दिल्ली टीमसोबत आहे. तो दिल्ली कॅपिटल्सचा डायरेक्टर आहे. सरकारकडून राजकीय नेते, अभिनेते, समाजसेवक आणि सेलिब्रिटी यांना सुरक्षा दिली जाते. व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेची मुदत संपली होती. प्रोटोकॉलनुसार, आढावा घेण्यात आला. त्यानंतर सौरव गांगुलीची सुरक्षा वाढवून झेड कॅटेगरी करण्याचा निर्णय घेतला“ असं बंगालमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नव्या झेड सुरक्षेतंर्गत 8 ते 10 पोलीस अधिकारी गांगुली सोबत असतील, अशी माहिती प्रवक्त्याने दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांगुलींनी आपल्या सुरक्षेत कुठल्याही पद्धतीची सुधारणा हवी आहे, अशी मागणी केली नव्हती. पण तरीदेखील बंगाल सरकारने हा निर्णय घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.









