विविध कार्यक्रमांचे आयोज़न
दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग शहरातील श्री दादा साई मंदिर मठात रविवार दिनांक ९ मार्च रोजी प्रतिष्ठापना दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविधी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ मार्च रोजी पालखी उत्सव सोहळा होणार आहे. तर त्यानंतर साई चरित्राचे प्रवचन, कीर्तन, भक्तीप्रेमोत्सव आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर मठाचे मठाधिपती दादा साई यांनी केले आहे.









