नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी डाबर इंडियाने मार्च 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाही अखेर 294.34 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षीच्या समान कालावधीशी तुलना करता हा नफा 21 टक्के इतका घटलेला दिसला आहे. मागच्या वषी जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये डाबर इंडियाने 377 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. कंपनीचा महसूल याच कालावधीमध्ये सात टक्के वाढ होत 2517 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने या कालावधीमध्ये 2141 कोटी रुपये खर्च केला आहे









