वेंगुर्ले/ वार्ताहर-
पार्ले टिळक विद्यालय, पार्ले-मुंबई येथे दहावी परीक्षेस बसलेल्या वेंगुर्ले दाभोली येथील सुकन्या आर्या शैलेंद्र प्रभू-खानोलकर हि आय.सी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेत 98.4 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या नेत्रदिपक यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.कु. आर्या शैलेंद्र प्रभू-खानोलकर हिच्या या नेत्रदिपक यशाबद्दल वेंगुर्ले तालुक्यातील शैक्षणिक संस्था, तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांतून तिचे अभिनंदन करण्यांत आले आहे.









