मौजे दापोली / वार्ताहर
दापोली तालुक्यातील दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनीतील भंगार चोरीप्रकरणी ६ चोरट्यांना दाभोळ सागरी पोलिसांनी छडा लावत अटक केली. मात्र त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले असता न्यायालयाने या चोरट्यांना जामीन मंजूर केला आहे. यात विजय दाभोळकर, अनिकेत मयेकर, चंद्रहास फणसकर, मकसूद खान, आशिष जांभारकर, योगेश बागकर (सर्व रा. दाभोळ) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला.