► वृत्तसंस्था / चेन्नई
2025 च्या प्रो कब•ाr लीग स्पर्धेतील येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात दबंग दिल्लीने विद्यमान विजेत्या जयपूर पिंक पँथर्सवर 29-26 अशा तीन गुणांच्या फरकाने थरारक विजय मिळविला. दबंग दिल्लीतर्फे कर्णधार आशु मलिक आणि संदीप यांची कामगिरी दर्जेदार झाली.
या वर्षाच्या प्रो कब•ाr लीग हंगामात 20 गुण गाठणारा दबंग दिल्ली हा पहिला संघ ठरला आहे. दबंग दिल्लीच्या संदीपने 7 टॅकल गुणासह अन्य पाच गुण वसुल केले. तर कर्णधार आशु मलिकने आपल्या अचूक चढायांवर संघाला 8 गुण मिळवून दिले. जयपूर पिंक पँथर्सतर्फे रेझा मिरबागेरी आणि डी. खत्री यांनी प्रत्येकी 5 गुण तर आर्यन कुमारने 4 टॅकल गुण मिळविले.
सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर कर्णधार आशु मलिकने आपल्या चढाईवर दबंग दिल्ली संघाचे खाते उघडताना तीन गुणांची आघाडी मिळवून दिली. जयपूर पिंक पँथर्सचा पहिला गुण खत्रीने नोंदविला. या सामन्यात दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाला. आर्यन कुमारने आपल्या चढाईं&वर जयपूर पिंक पँथर्सला दबंग दिल्लीशी बरोबरी साधून दिली. खेळाच्या पहिल्या सत्रात पिंक पँथरने दबंग दिल्लीवर 6-5 अशी एका गुणाची आघाडी मिळविली होती. दबंग दिल्लीच्या संदीपने सामन्याच्या पूर्वाधार्थ 4 टॅकल गुण मिळविले. तर अजिंक्य पवारने आपल्या चढाईवर आणखी काही गुण मिळवून दिले. मध्यंतराला केवळ दोन मिनिटे बाकी असताना रेझा मिरबागेरीने आपल्या दोन चढायांवर 5 गुण मिळविल्याने जयपूर पिंक पँथर्सने मध्यंतरावेळी दबंग दिल्लीवर 13-12 अशी एका गुणाची बढत घेतली होती. सामन्याच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर दबंग दिल्लीच्या खेळाडूंनी पहिल्यांदाच जयपूर पिंक पँथर्सचे सर्वगडी बाद करुन आपल्या संघाला पुन्हा आघाडीवर नेले. संदीपने 5 गुण घेतले. तर पवारची खेळी आक्रमक झाल्याने दबंग दिल्लीने जयपूर पिंक पँथर्सवर 4 गुणांची आघाडी मिळविली. जयपूर पिंक पँथर्सने शेवटच्या दोन मिनिटांत ही पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे दबंग दिल्लीने ही लढत 29-26 अशा तीन गुणांच्या फरकानी जिंकली. या विजयामुळे दबंग दिल्लीने स्पर्धेच्या गुणतक्त्यात आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे.









