वृत्तसंस्था / पुणे
2024 च्या कबड्डी हंगामातील येथे सुरू असलेल्या 11 व्या कब•ाr लीग स्पर्धेतील सामन्यात दबंग दिल्लीने तेलुगू टायटन्सचा 33-27 अशा सहा गुणांच्या फरकाने पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
दिल्ली आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील सामना दबंग दिल्लीच्या नवीनकुमारने सुपर 10 गुण तर आशु मलिकने 9 गुण नोंदविले. तेलुगू टायटन्सला पहिला गुण विजय मलिकने मिळवून दिला. त्यानंतर आशु मलिकने आपल्या चढायांवर दबंग दिल्लीला 2 गुणांची आघाडी मिळवून दिली. आशु मलिकला नवीनकुमारकडून चांगली साथ मिळाली. त्यानंतर मोहीतच्या शानदार कामगिरीमुळे तेलुगू टायटन्सने दबंग दिल्लीचे सर्वगडी बाद करुन आघाडी मिळविली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत तेलुगू टायटन्सने दबंग दिल्लीवर 17-13 अशा चार गुणांची आघाडी घेतली. सामन्याच्या उत्तराधार्थ दबंग दिल्लीच्या आक्रमक खेळासमोर तेलुगू टायटन्सच्या कब•ाrपटूंना गुण मिळू शकले नाहीत. दोन्ही संघ यावेळी 18-18 असे बरोबरीत होते. सामन्यातील शेवटचा टप्पा सुरू होण्यापूर्वी तेलुगू टायटन्सने दबंग दिल्लीवर 24-22 अशी दोन गुणांची निसटती आघाडी मिळविली होती. सामना संपण्यात 10 मिनिटे बाकी असताना नवीनकुमारने सुपर 10 गुण मिळवित आपल्या संघाला तीन गुणांच्या फरकाने आघाडीवर नेले. अखेर दबंग दिल्लीने हा सामना 33-27 अशा सहा गुणांच्या फरकाने जिंकला. मात्र या सामन्यातील विजयामुळे गुजरात जायंट्सचे बाद फेरीत पोहोचण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे.









