पांगुळ गल्ली कॉर्नरवरील घटनेत युवक जखमी
बेळगाव : छोट्या गॅस सिलिंडरला आग लागून एक युवक जखमी झाला. रविवारी सकाळी गणपत गल्ली व पांगुळ गल्ली कॉर्नरवर ही घटना घडली आहे. जखमी युवकावर उपचार करण्यात आले आहेत. मनीष ठाकुर (वय 30) असे त्याचे नाव आहे. तो स्वीटकॉर्न विकण्याचा व्यवसाय करतो. रविवारी सकाळी अचानक सिलिंडरला आग लागून भडका उडाला. या घटनेत त्याचा गाडाही जळाला आहे.









