नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला नुकाताच तौक्ते चक्रीवादळचा जोरदार फटका बसला. त्यातून सावरण्याआधीच भारताच्या पूर्व किनारपट्टीवर एक नवं चक्रीवादळ घोंघावू लागलं आहे. येत्या २६ मे रोजी उडिसा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर ‘यास’ हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांसोबत चक्रीवादळाशी लढण्याबाबत उपाययोजनांवर चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्यविषयक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीसाठी एनडीआरएफच्या तुकड्या देखील सज्ज ठेवण्यात आल्या असल्याची माहिती देखील देण्यात आली.
https://twitter.com/ANI/status/139635037295688909
या बैठकीत वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थआपन विभागातील प्रतिनिधी, नागरिक उड्डयण, दूरसंचार, वीज, आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयातील सचिव सहभागी झाले होते.









