पुणे / प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरातील न्यून दाबाच्या क्षेत्राचे लवकरच वादळात रूपांतर होणार असून, 28 ऑक्टोबरच्या संध्याकाळी हे वादळ आंध्र किनारपट्टीला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.या वादळाला मोनथा हे नाव देण्यात आले आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात्रील क्षेत्र शनिवारी 7 किमी वेगाने पश्चिमेकडे भारतीय किनारपट्टीकडे सरकत आहे.
सोमवारी पहाटे याचे वादळात रूपांतर होणार आहे.उत्तर पश्चिमेकडे प्रवास करीत याची मंगळवारपर्यंत आणखी तीव्रता वाढणार आहे. मंगळवारी सायंकाळी आंध्र मधील मछलीपट्नम आणि कलिंगपटनम दरम्यान हे वादळ किनारपट्टी ओलांडणार आहे. यामुळे सोमवारपासूनच आंध्र, रायलसीमा आणि ओरिसा राज्यात सतर्कतेची सूचना असून, रेड अलर्ट देण्यात आला आहे.या दरम्यान मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना आहे. आपत्ती निवारण दलाला पाचारण करण्यात आले आहे.
आंध्रला रेड अलर्ट
हे वादळ आंध्र किनारपट्टीला तशी 100 ते 110 किमी वेगाने धडकणार असून, यामुळे सोमवारपासूनच या भागात अती मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहेत. अरबी समुद्रातील क्षेत्र कायम अरबी समुद्रातील न्यून दाबाचे क्षेत्र कायम असून, पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर पश्चिमेकडे ते प्रवास करीत आहे. या दोन्ही क्षेत्रांच्या प्रभावामुळे राज्यात बुधवारपर्यंत वादळी पावसाचा अंदाज आहे.कर्नाटक किनारपट्टीवर सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा आहे.








