वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या अलाबामा राज्यात चक्रीवादळामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अलाबामामध्ये चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. झाडे कोसळण्याबरोबरच वीजपुरवठय़ावरही परिणाम झाला आहे. हजारो लोक विजेविना जगत आहेत. अलाबामाचे गव्हर्नर के इवे यांनी 9 लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे. पडझड झालेल्या भागात मदत व बचाव पथके पाठविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









