रत्नागिरी :
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची रत्नागिरी ते पंढरपूर ही पहिली ३०० कि.मी.ची सायकलवारी अनेक अड्यळबांवर मात करत पंढरपुरात पोहोचली. विठुरायाच्या दर्शनाने या सायकलवारीतील सर्वजण भावुक झाले. दहा दिवसांची ही वारी पूर्ण करून सायकलस्वार वारकरी रत्नागिरीत परतले. ही वारी ऐतिहासिक व अविस्मरणीय ठरली. पुढील वर्षी रत्नागिरीतून अधिक सायकलस्वार वारकरी या वारीचा अनुभव घेणार असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
‘सायकल चालवा – निरोगी रहा, झाडे लावा, झाडे जगवा, सायकल चालवा प्रदूषण वाचवा,’ असा पर्यावरण पूरक संदेश मा वारीतून देण्यात आला. तसेच मक्ती आणि शक्ती असा संदेश या वारीतून दिला. या वारीत विशाल भोसले, महेश सावत, अमित पोटफोडे, आरती दामले, गजानन भातडे, नारायण पाटोळे, राकेश होरचे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे आणि विवेक खानविलकर सहभागी झाले.
रत्नागिरीतीत विठ्ठल मंदिरातून वारीला सुरुवात झाली काकड आरती व प्रसाद घेऊन हे वारकरी पाली, साखरपा, आंबा पाटमार्गे मलकापूर, कोकरूड, कराड व उंब्रजला पोहोचले रात्री पावसामुळे पोहोचण्यास उशिर झाला तरीही उंब्रज भोसलेवाडीत ग्रामस्व वाट पाहत होते स्वागताचेकी सरपंच मारुती ढेबे, पत्रकार अभिजीत पवार, फरकार प्रवीण कांबळे ग्रामस्थ हभप किरण भोसले, संदीप भोसले, सुधाकर भोसले, प्रकाश भोसले, संदेश भोसले, विक्रम भोसले, स्वप्निल भोसले, संजय भोसले, अक्षय भोसले, अधिक भोसले, विजय भोसले, रतन भोसले आणि सीमा भोसले आदी उपस्थित होते.
विशाल भोसले म्हणाले, आमच्या एका सायकल वारकऱ्याची चेन तुटली. अंग्रजहून पुढे भरपूर ऊन, जोराचा वारा होता पण पांडुरंगाच्या कृपेने सर्व अडचणी दूर झाल्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागल्याने प्रवास पूर्ण केला. पांडुरंगाच्या आशीर्वादाने सर्व सदस्यांच्या सहकार्याने रत्नागिरीतील दानशूर व्यक्तींची मदत मिळाली. आम्ही सुखरूप परतली. पुढच्या वर्षी अजूनही मोठ्या संख्येने बारीसाठी रत्नागिरी सायकल काबचे सदस्य जाण्याची आला वाक्त करण्यात आली आहे.
‘पांडुरंगाचे दर्शन घ्यायवेद’ या ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही सर्वजण पुढे जात राहिलो. विठ्ठलमाऊलीच्या कृपेने सर्व अडयले पार करत आम्ही यशस्वीपणे पंढरीची वारी पूर्ण केली पंढरपूरच्या वेशीवर पोहोचताच झालेला आनंद शब्दात वर्णन करता येणार नाही जवळपास ४००० सायकलस्वारांच्या उपस्थितीत त्या भक्तीमय गर्दीत सामील होण्याचा आनंद आगि ऊर्जेचा अनुभव अवर्णनीय होता. तसेच सायकलस्वारांच्या रिगणाची अनुभूती कधीच विसरता येणार नाही, असे ते म्हणाले.
- सायकलिस्ट वस्लब सदस्यांच्या सहकार्यामुळे वारी यशस्वी
यंदाचे वारकरी विशाल भोसले म्हणाले, पंढरीची वारी करायची हे लहानपणापासूनच वाटत होते. माझे चुलते सायकलवरून पंढरीला जायचे. मलाही वाटलं आपण देखील एक दिवस जाऊ. गेल्यावर्षी मी एकटाच रत्नागिरीतून गेलो होतो. रत्नागिरीतून उंब्रज ग्रुपबरोबर पंढरपूरला पोहोचलो. बारी केल्यानंतर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला घेऊन यायचे ठरवले ही कल्पना डॉ. नितीन सनगर, प्रसाद देवस्थळी, महेश सावंत, दर्शन जाधव, सचिन नाचणकर, मकरंद पटवर्धन व ग्रुपमध्ये सर्वांना सांगितली, सर्वांना ही कल्पना आवडती आम्ही तुमच्यासोबत जाहोत’ असा शब्द सर्वांनी दिला. त्यानंतर नियोजन ठरलं. आरती दामले यांनी सांगितले, रत्नागिरी सायकलिस्ट क्तबने आयोजित केलेली यंदाची रत्नागिरी-पंढरपूर सायकल वारी ही केवळ एक सायकल राइड नव्हती तर तो एक भक्तीचा, आत्म्याचा आणि अविस्मरणीय अनुभवाचा प्रवास होता.








