वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनची ऑलिम्पिक तसेच विश्व चॅम्पियन महिला सायकलपटू केटी मर्चंट येथे आयोजिलेल्या सायकलिंग स्पर्धेत जखमी झाली. या स्पर्धेत मर्चंटने जर्मनीच्या अॅलिसा प्रोपस्टेरच्या सायकलला जोरदार धडक दिली. या घटनेत मर्चंटला दुखापत झाली असून तिला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लंडनमध्ये महिलांची किरीन सायकल शर्यत आयोजित केली होती. या घटनेमुळे सदर शर्यत तहकूब करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत केटी मर्चंटने ब्रिटनला सांघिक स्प्रिंट सायकलिंग प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले होते. तसेच गेल्या ऑक्टोंबरमध्ये डेन्मार्क येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत मर्चंट, केपवेल आणि फिनूकेन या त्रिकुटाने स्प्रिंट प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.









