कोल्हापूर :
एका सायबर भामट्याने शहरातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या पत्नीच्या मोबाइलवर लिंक पाठवून, या लिंकला क्लिक करण्यास सांगितले. त्या लिंकला क्लिक करतास त्या महिलेच्या वेगवेगळ्या बॅंक खात्यातील सुमारे सात लाख ऊपये परस्पर उचलुन गंडा घातला आहे. या फसवणूकीने संबंधीत महिलेला मोठा मानसिक धक्का बसला असून, या घडल्या प्रकाराबाबत त्या येत्या दोन ते तीन दिवसात पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सुत्रानी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संबंधीत महिलेच्या मोबाईलवर सायबर भामट्याने संपर्क साधून एक लिंक पाठविली. त्या लिंकमध्ये काय आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी ती लिंक ओपन केली. लिंक ओपन झाल्यानंतर थोड्याच वेळातच त्या महिलेच्या वेगवेगळ्या बॅंक खात्यातील सुमारे सात लाख रुपये तत्काळ डिबीट झाले.
बँक खात्यातील लाखो ऊपये डिबीट झाल्याचे पाहून, त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. या घडल्या प्रकाराची माहिती त्यांनी कुटुंबियांनी दिली. त्यानंतर कुटूंबीयांनी या घडल्या घटनेची माहिती अधीकृत यंत्रणेला माहिती दिली. त्या माहितीनंतर संबंधीत यंत्रणेने त्या महिलेची बॅंकेतील सर्व खाती गोठविली आहेत.
दरम्यान, सायबर भामट्यांनी शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीला तिची महाविद्यालयीन शुल्क भरण्यासाठी तिच्या पालकांनी तिच्या बँक खात्यावर सुमारे तीन लाख रुपये ठेवले होते. त्या विद्यार्थीनीला सायबर भामट्यांनी शहरातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या पत्नीची फसवणूक केली. त्याचप्रमाणे महाविद्यालीन विद्यार्थींनीची केली. फसगत झालेली विद्यार्थिनी सातारा जिह्यातील राहणारी असून, तिने या घडल्या प्रकाराविषयी ऑनलाईन तक्रार केल्याचे माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली. या दोन्ही फसवणूकीची कोल्हापूर सायबर सेलने गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांची चौकशी सुऊ केली आहे, अशी माहिती सुत्रानी दिली.








