सांगली :
जिल्ह्यातील शिक्षक आणि नोकरदारांच्या खात्यांवर हॅकर्सनी डोळा ठेवला आहे. स्टेट बैंक ऑफ इंडिया (एँ) नावाने एक बनावट व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणुकीचा डाव रचला जात आहे. या ग्रुपमध्ये अनेक शिक्षक व पगारदार कर्मचारी जोडले गेले असून “योनो अॅप डाउनलोड करा, त्याद्वारे केवायसी जोडा” असे संदेश पाठवले जात आहेत. या सर्व एपीके फाईल असून या उघडल्यावर आपला मोबाईल हॅक होऊन आपल्या बैंक खात्याची संपूर्ण माहिती हॅकर मिळवतो. त्यामुळे या फाईल उघडू नयेत असा इशारा सायबर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक बोबडे यांनी स्पष्ट केले आहे.
सायबर अरेरटची भीती दाखवून दोन शिक्षकांची लाखो रुपयांची लूट केल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक वादळ या माध्यमिक शिक्षक आणि निवृत्त शिक्षकांच्या ग्रुपवर देखील घुसखोरी करून असे मेसेज पाठविण्यात आल्याने शिक्षक धारतावले आहेत. शिक्षकांच्या पगार आणि पे-न्शन खात्यांवर लक्ष्य साधून ही फसवणूक केली जात असल्याची चर्चा आहे. काही शिक्षकांनी या संदेशाबाबत थेट रटेट बँक शाखेत चौकशी केली असता, बँकेने असा कोणताही ग्रुप तयार केलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांना कोणत्याही अनोळखी दुव्यावर (लिंक) क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, ‘शैक्षणिक वादळ’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवरही असे संदेश पसरवले गेल्यानंतर सतर्कता म्हणून संबंधित क्रमांक त्वरित ग्रुपमधून वगळण्यात आले. तरीदेखील जिल्ह्यातील पगारदार वर्गात मोठ्या प्रमाणावर संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक पोलिस आणि सायबर विभागाकडे कारवाईची मागणी होत आहे. विशेषतः पगारदार आणि पेन्शनधारकांचे मोबाईल क्रमांक हॅकर्सपर्यंत कसे पोहोचले, याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, हे फरावणूक करणारे ग्रुप केवायसी, अपडेट, बोनस किंवा कर्ज मंजुरीसारख्या आमिषांचा वापर करून खातेधारकांचे वैयक्तिक तपशील आणि पासवर्ड मिळवतात. त्यानंतर योनो अॅप किंवा इंटरनेट बँकिंगमार्फत खाती रिकामी करण्याचा डाव आखला जातो.
याबाबत सायबर पोलीसांनी नागरिकांना सूचना केली आहे की, अधिकृत बैंक संकेतस्थळ व्यतिरिक्त इतर कुठल्याही दुव्याद्वारे केवायसी करू नये. शंका आल्यास त्वरित जवळच्या शाखेत चौकशी करून खात्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. सांगलीत घडलेली ही घटना पुन्हा एकदा दाखवते की, सायबर फसवणूक करणारे हॅकर्स पगारदार व पेन्शनर वर्गाला थेट लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहून डिजिटल सुरक्षेबाबत सजग राहणे अत्यावश्यक ठरते.
शिक्षक आणि नोकरदारांच्या खात्यांवर हॅकर्सचा डोळा
नावाने बनावट व्हॉट्सअॅप ग्रुप करुन फसवणूक
सायबर अरेस्टची भीती दाखवून लाखो रुपयांची लूट
शैक्षणिक वादळ’ या ग्रुपवर घुसखोरी
मोबाईल क्रमांक हॅकर्सपर्यंत कसे पोहोचले याच्या चौकशीची मागणी
अनोळखी दुव्यावर (लिंक) क्लिक न करण्याचा सल्ला








