प्रतिनिधी/ बेळगाव
सीमादेवीनगर, सुळगा-हिंडलगा येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे दहा हजार रुपयांची भांडी व गृहोपयोगी वस्तू पळविल्या आहेत. शुक्रवारी ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
निंगाप्पा लचाप्पा लमाणी यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवार दि. 6 जून रोजी निंगाप्पा व त्यांचे कुटुंबीय सकाळी 10 वाजता घराला कुलूप लावून कामाला गेले होते. सायंकाळी यापैकी काहीजण पाच वाजण्याच्या सुमारास कामावरून परतले. त्यावेळी चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून दोन तांब्याच्या घागरी, जुनी सायकल, स्वयंपाकाचे साहित्य पळविले आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.









