रत्नागिरी :
सीमा शुल्क विभाग अर्थात कस्टमच्या पथकाने शुक्रवारी एक एलईडी नौका पकडून मत्स्य विभागाच्या ताब्यात दिली होती. दरम्यान, शनिवारी रत्नागिरीच्या सागरीक्षेत्रात आणखी एक एलईडी नौका पकडण्यात कस्टमच्या गस्ती नौकेला यश आले.
ही कारवाई समुद्रात १० सागरी मैल अंतरात करण्यात आली. कारवाईत जप्त करण्यात आलेली एलईडी नौका रत्नागिरीतील मुरुगवाडा येथील सुगंधा सुरेश टाकळे यांच्या मालकीची असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली.








