हेस्कॉम व्यवस्थापकीय संचालकांची माहिती : उद्योजकांशी केली चर्चा
बेळगाव : विद्युत बिलामध्ये वाढ केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून हेस्कॉमकडे आले आहेत. केईआरसीने घालून दिलेल्या नियमानुसारच विद्युत बिलात वाढ करण्यात आली आहे. तसेच वाढीव विद्युत मिला संबंधी सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहे, तोवर सर्व विद्युत ग्राहकांनी आपले विद्युत बिल भरावे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद रोशन यांनी मंगळवारी बेळगाव मध्ये दिली. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सदस्यांनी इस्कॉनच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत चर्चा केली. वाढत्या वीज बिलाने उद्योजकांसह सर्वसामान्य वीज बिन भरणे अशक्य आहे त्यामुळे वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी उद्योजकांनी केली. यावेळी बोलताना मोहम्मद रोशन यांनी दरवाढ का केली या संदर्भातील माहिती दिली. प्रत्येक वर्षी राज्यात नवीन दरवाढ लागू केली जाते. यावर्षीही अशाच प्रकारे दरवाढ लागू करण्यात आली आहे. हेस्कॉम ही वीज वितरक कंपनी असल्यामुळे कोणाकडून तरी वीज खरेदी करून ती ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. त्यामुळे ज्यांच्याकडून वीज खरेदी केली त्यांना ते पैसे देणे गरजेचे असते. ग्राहकांनी वापरलेल्या विजय इतकेच बिल त्यांना देण्यात आले आहे. या बिलातूनच कर्मचाऱ्यांना पगार दिली जाणार असल्याने ग्राहकांनी वेळेत विद्युत भरण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स तसेच विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, हेस्कॉमचे अधिकारी उपस्थित होते.









