वृत्तसंस्था/ लखनौ
युनिसेफ ऑस्ट्रेलियाचे राजदूत तसेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने येथील शासकीय स्कूलला सदिच्छा भेट देऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी हितगूच साधले.
औरंगाबादमधील बेसिक विद्यालयला कमिन्सने भेट देऊन तेथील शिक्षण पद्धतीची माहिती करून घेतली. विद्यार्थ्यांसमवेत त्याने काही वेळ क्रिकेट खेळण्यात आपला वेळ घालवला. दरम्यान या शाळेतील दोन विद्यार्थिनींनी कराटेची प्रात्यक्षिके सादर केली. या शाळेतील व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुविधाबाबत कमिन्सने समाधान व्यक्त केले.









