वृत्तसंस्था / कॅनबेरा
21 नोव्हेंबरपासून यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिकेला प्रारंभ होत आहे. या मालिकेतील पर्थ येथे पहिली कसोटी खेळविली जाणार असून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे कमिन्सच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टिव्ह स्मिथ करणार आहे.
गेल्या जुलै महिन्यात पॅट कमिन्सला पाठ दुखापतीची समस्या पहिल्यांदा सुरूवात झाली होती. या दुखापतीमुळे त्याला काही मालिकांना मुकावे लागले होते. दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील ब्रिस्बेन येथे 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कमिन्स पूर्णपणे तंदुरुस्त राहिल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.









