वृत्तसंस्था / मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार तसेच अष्टपैलू पॅट कमिन्सला दुखापतीमुळे आगामी भारत व न्यूझीलंडविरुद्ध मालिकांना मुकावे लागत आहे. सदर माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने मंगळवारी दिली आहे. पॅट कमिन्सला गेल्या काही दिवसांपासून वारंवार पाठदुखीचा त्रास जाणवत होता. या दुखापतीवर वैद्यकीय इलाज करुन घेण्याचा कमिन्सला सल्ला देण्यात आला. कमिन्सला डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने त्याला ऑक्टोबरमध्ये भारत व न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांना मुकावे लागणार आहे.
1 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान तर त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. या दोन्ही मालिका भारतात होणार आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियात पर्थ येथे 21 नोव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे. या अॅशेस मालिकेत पूर्ण तंदुरुस्त राहण्यासाठी कमिन्सने आगामी मालिकांतून माघार घेतली आहे. 32 वर्षीय पॅट कमिन्सने इंग्लंडमध्ये झालेल्या चार कसोटी सामन्यात 95 पेक्षा अधिक षटकांची गोलंदाजी केली होती.









