पर्वरी : येथील श्री लोकनाथतीर्थ मठात संस्कृती दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी अर्णवी पर्रीकर हिने कथाकथन तर समीहन, आरुष, वेदांग, संचित या विद्यार्थ्यांनी नाटकुले व संस्कृती गीत सादर केले. यावेळी संस्कृत म्हणींची दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – लहान गट : प्रथम-प्रतीक सोगरवाल, द्वितीय-आरुष जोशी, तृतीय-वेदांत शेट्टी. मोठा गट : प्रथम-समीहन काळे व अर्णवी पर्रीकर, द्वितीय-आरुष जोशी, तृतीय-जीविका नाईक. स्पर्धेचे परीक्षण मनोज पारीख, सौरा काळे, उमा नाईक यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक प्रभाकर मणेरीकर उपस्थिती होते. विशेष अतिथी म्हणून केंद्रीय विद्यालय आएनएस मांडवीचे संस्कृत अध्यापक मनोज पारीख होते. दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रेया काळे यांनी प्रास्ताविक केले. केंद्राच्या संचालिका डॉ. गीता काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून परिचय केला. यावेळी संस्कृत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे तसेच स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. पारीख यांनी यावेळी संस्कृत गीत गायिले. त्यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन उमा नाईक, सौरा काळे व साक्षी देशपांडे यांनी केले. उमा नाईक यांनी आभार मानले. विद्यार्थिंनींच्या श्री अन्नपूर्णा स्त्राsत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.









