भीम बेडकाच्या गुहांमधली चित्र म्हणजे आमच्या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या वाटा ठरतात. या चित्रांमधल्या वेशभूषा, केशभूषा, वस्त्रलंकार, सगळ्या चित्रकलेमुळे आणि रंगरेषांमुळे आमच्यापर्यंत जशाच्या तशा पोचल्या आहेत. या सगळ्या कला जगाचे लक्ष वेधून वेधणाऱ्या ठरल्या आहेत. या चित्रातील रंगांसाठी केलेल्या तुलीका करण्याचे ज्ञान त्या काळच्या लोकांना होते. न उडणारे किंवा न विकणारे रंग बनवण्याचे कसं याचं ज्ञान त्याकाळी लोकांच्याकडे होतेच. या सगळ्याची माहिती पुराण ग्रंथात जपून ठेवली आहे. कोणत्या प्राण्याचे केस, कोणत्या रंगासाठी वापरायचे याच्याही नोंदी आहेत. शंखशिप, शिंपल्यांचे चूर्ण करून रंग टिकवण्यासाठी वापरले जात असत. चित्रा चित्रकलेत त्रिगुण शक्ती आहे, असं मानतात म्हणजेच चित्रात मूळ रंग तीनच तांबडा, निळा आणि पिवळा याच्या मिश्र्रणातून सप्तरंग बनतात. सप्तरंगांच्या प्रमाणाबद्ध मिश्र्रणातूनच पांढरा रंग सातवी कथेचा निर्माण होतो. त्रिगुण त्याचा परिणाम कर्मयोगातून दिसतो आणि कर्मयोगाची परिणीती शुभ्र सात्विक ज्ञानात होते अशी चित्रकला सौंदर्यपूर्ण असते. कारण जसे आकार सुसंवादी व लयबद्ध तसेच रंग समाधी किंवा विसमवादी असतात चित्र आणि शिल्प या खऱ्या तर जुळ्या बहिण. परंतु चित्रकलेत निराकार रिक्त जागेतून व्यक्त होत जात असल्यामुळे त्या महत्त्वाच्या ठरतात. सगुण साकार गोष्टी चित्रात झाड, वेली, डोंगर लक्ष वेधून घेतात, पण निळा आकाश जो आपण वॉश दिलेला असतो त्या रूपात असते. आमचं तिकडे लक्षच जात नाही. एखादा आंधळा म्हातारा आणि त्याची छोटी नात, तिचं फाटकं परकर-पोलक या सगळ्या गोष्टी जरी दारिद्र्याच्या असल्या तरी या मुलीच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि दोन टोकांच्या दोन प्रवृत्ती या सगळ्या अमूर्त गोष्टी अशा चित्रातून उलगडतात. कारण या चित्रातले डोळे असे काही बोलके असतात. तिथे सगळ्या चित्राला एक वेगळाच परिणाम देऊन जातात. नारळाची झाड, आश्र्रम वेली, हरण ही जास्त सौंदर्यपूर्ण वाटतात तसंच राजवाड्याचं वैभव सुद्धा बुऊज, दरवाजे, झुंबर यातून व्यक्त होत असतात. अशा या सौंदर्याला व्यक्त करणारी चित्रकला आमच्या अनेक संस्कृतीच्या ठेवा घेऊनच आमच्यापर्यंत पोहोचते.
Previous Article‘सुझुकी’च्या गुजरात प्रकल्पाने ओलांडला 30 लाखांचा टप्पा
Next Article ईव्हीएमवर पूर्ण विश्वास : काँग्रेस खासदार चिदंबरम
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








