रुतुराज गायकवाडो शानदार अर्धशतक, मोईन अलो 26 धावांत 4 बळी, मेयर्सी अर्धशतकी खेळी वाया
वृत्तसंस्था/ चेन्नई
येथील चेपॉक मैदानावर शेवटाच्या चेडूपर्यंत रंगलेल्या रोमांक सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने लखनौवर 12 धावांनी विजय मिळवला. प्रारंभी चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 बाद 217 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर विजयी लक्ष्या पाठलाग करताना लखनौला 7 बाद 205 धावापर्यंत मजल मारता आली. अर्धशतकवीर ऋतुराज गायकवाड व चारर बळी घेणारा मोईन अली चेन्नईच्या विजयोचे शिल्पकार ठरले. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये 24 व्यांदा दोनशेपेक्षा जास्त धावा करण्या विक्रमही चेन्नईने यावेळी केला.
लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली. गायकवाड व कॉनवे यांनी प्रारंभापासूनच जोरदार फटकेबाजी करीत पॉवरप्लेच्या 6 षटकांत 79 धावा फटकावल्या आणि 8 षटकांतच संघाचे शतक फलकावर लावले. या दोघांनी भागीदारीचे अर्धशतक 28 चेंडूत पूर्ण केले आणि 49 चेंडूत शतकी भागीदारी पूर्ण केली. दहाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर गायकवाड सर्वप्रथम बाद झाला. रवी बिश्नोईने गायकवाडला झेलबाद केले. गायकवाडने केवळ 31 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांच्या मदतीने 57 धावांची आतषबाजी केली. नंतर कॉनवेही उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. कृणाल पंडय़ाने त्याचा झेल टिपला. कॉनवेने 29 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 47 धावा फटकावल्या. नंतर आलेल्या प्रत्येक फलंदाजाने जोरदार फटकेबाजी करीत धावसंख्या वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पण या प्रयत्नात ठरावीक अंतराने त्यांचे गडीही बाद होत गेले. शिवम दुबेने 27, मोईन अलीने 19 धावा फटकावल्या. अष्टपैलू बेन स्टोक्स मात्र 8 धावा काढून बाद झाला. जडेजाही केवळ 3 धावा काढून बाद झाला तर धोनी व अम्बाती रायुडू यांनी अखेरच्या टप्प्यात जोरदार फटकेबाजी केली. दोघांनी शेवटच्या तीन षटकांत 39 धावा झोडपल्या. धोनी 3 चेंडूत 2 षटकार मारत 12 धावांवर बाद झाला तर रायुडू 27 धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युतरादाखल खेळताना केएल राहुल व मेयर्स जोडीने फटकेबाजी करताना 5.3 षटकांत 79 धावीं सलामी दिली. पण या फटकेबाजाया प्रयत्नात मेयर्स मोईन अलाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 22 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 53 धावा केल्या. यानंतर केएल राहुल (20), दीपक हुडा (2), कृणाल पंडय़ा (9) हे लागोपाठ बाद झाल्याने लखनी 4 बाद 130 अशी स्थिती झाली होती. यानंतर स्टोइनिस (21), निकोलस पूरन (32), बडोनी (23) व के. गौथम (नाबाद 17) यांनी फटकेबाजी करत संघाला दोनशा टप्पा गाठून दिला. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. लखनौला 20 षटकांत 7 बाद 205 धावापर्यंत मजल मारता आल्याने त्यांना 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
संक्षिप्त धावफलक ः चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 7 बाद 217 ः गायकवाड 57 (31 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), कॉनवे 47, शिवम दुबे 27, मोईन अली 19, स्टोक्स 8, अम्बाती रायुडू नाबाद 27, जडेजा 3, धोनी 12, सँटनर नाबाद 1, अवांतर 16. गोलंदाजी ः मार्क वुड 3-49, बिश्नोई 3-28, अवेश खान 1-39.
लखनौ सुपरजायंट्स 20 षटकांत 7 बाद 205 (केएल राहुल 20, मेयर्स 53, दीपक हुडा 2, कृणाल पंडय़ा 9, मार्क स्टोइनिस 21, निकोलस पूरन 32, बडोनी 23, के. गौथम नाबाद 17, मार्क वूड नाबाद 10). गोलंदाजी ः मोईन अली 26 धावांत 4, तुषार देशपांडे 45 धावांत 2, सँटनर 21 धावांत 1 बळी.