Butter chakali थोड्याच दिवसात दिवाळी येत आहे. यामुळे घराघरात फराळाची लगबग देखील सुरु होईल.दिवाळीच्या फराळातील चकली तर सर्वानाच आवडते.पण आज आपण एक झटपट आणि कुरकुरीत चकलीची वेगळी रेसिपी जाणून घेणार आहोत.
बटर चकलीसाठी लागणारे साहित्य
३ कप पाणी
२ चमचे अमूल बटर
पाव चमचा हिंग
चवीनुसार मीठ
३ कप तांदळाच पीठ
१ चमचा ओवा
तेल
कृती
सर्वप्रथम गॅसवर३ कप पाणी गरम करत ठेवावे. त्यामध्ये २ चमचे अमूल बटर आणि पाव चमचा हिंग घालावा.बटर मध्ये मीठ असल्यामुळे चवीनुसार पाण्यामध्ये मीठ टाकावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये ३ कप तांदळाचं पीठ घालावे.आणि लगेचच लाटण्याने किंवा पळीने ते पीठ व्यवस्थित घोटून घ्यावं जेणेकरून पिठात गुठळी होणार नाही.यांनतर गॅस बंद करावा आणि ५ मिनिटे पीठ झाकून ठेवावे.त्यानंतर सर्व पीठ परातीमध्ये काढून घ्यावे, आणि त्यामध्ये १ चमचा ओवा घालून पीठ गरम असतानाच पीठ मऊसर मळून घ्यावे.यांनतर चकलीच्या साच्यात पीठ घालून चकल्या बनवून घ्याव्यात.यांनतर गॅसवर तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवर सर्व चकल्या तळून घ्याव्यात.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









