5 टक्के घटीसह 2453.19 हजार मेट्रीक टनवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात जुलैमध्ये 5.5 टक्के इतकी कपात झाली असल्याची माहिती आहे. सरकारने यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली असून जुलैमध्ये 2453.19 हजार मेट्रीक टन इतके कच्चे तेल उत्पादीत केले गेले.
पेट्रोल व डिझेल यांचे उत्पादन जुलैमध्ये घटून 2.45 दशलक्ष टन इतके झाले आहे. जे मागच्या वर्षी जुलैमध्ये 2.54 दशलक्ष टन इतके होते. महिन्याचे उत्पादनाचे लक्ष हे 2.50 दशलक्ष टन इतके होते, अशीही माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालयाने दिली आहे. ओएनजीसीने 1.7 टक्के कमी म्हणजेच 1.63 दशलक्ष टन इतके कच्चे तेल उत्पादीत केले आहे. आर्थिक वर्षात एप्रिलनंतरच्या चार महिन्यात कच्चे तेल उत्पादन 9.91 दशलक्ष टन होते. एप्रिल- जुलै 2021 मध्ये ते 9.96 दशलक्ष टन इतके होते. 2021-21 मध्ये 29.7 दशलक्ष टन इतके असणारे उत्पादन 2022-23 मध्ये 30.8 दशलक्ष टन इतके तर याहीपुढे जाऊन 2023-24 मध्ये 34 दशलक्ष टनवर पोहचेल, असा विश्वास मंत्री हरदीप सिंग यांनी व्यक्त केला आहे.
ओएनजीसीच्या गुजरात व आसाम येथून कमी प्रमाणात उत्पादन घेण्यात आले. नैसर्गिक वायुचे उत्पादन मात्र 2.88 अब्ज क्युबिक मीटरसह मागच्यावेळेप्रमाणे तेवढेच राहिले आहे. तर ओएनजीसीच्या गॅस उत्पादनात 4 टक्के वाढ दिसली आहे.









