► प्रतिनिधी/ बेळगाव
सोगल ता. सौंदत्ती, जि. बेळगाव येथील सीआरपीएफ जवान मल्लाप्पा विठ्ठल कांबळे (वय 45) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून किडणीच्या आजाराने ते त्रस्त होते. महाराष्ट्रातील मुदखेड येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शनिवारी सोगल येथे त्यांच्या गावी आणण्यात आले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सीआरपीएफच्या जवानांनी मानवंदना दिली. त्यांच्या पश्चात वडील विठ्ठल, आई निलव्वा, पत्नी हेमव्वा, मुलगा पार्श्वनाथ, मुलगी मालती असा परिवार आहे









