वृत्तसंस्था/ सुकमा
छत्तीसगडमधील सुकमा येथे शनिवारी सकाळी एका सीआरपीएफ जवानाने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वीच सदर जवान रजेवरून परतला होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विपुल भुयान असे संबंधिताचे नाव असून ते 226 बटालियनमध्ये कार्यरत होते. ते आसामचे रहिवासी होते. त्यांची नियुक्ती गदिरस पॅम्पमध्ये होती. शनिवारी सकाळी पॅम्पमधील स्वच्छतागृहात त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून सहकारी सैनिक तेथे आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. राज्यात गेल्या 20 दिवसात 5 जवानांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या आहेत. यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे.









