नदीत यावर्षी जादा पाणीसाठा : सतर्क राहण्याचे नागरिकांना आवाहन
खानापूर : मकर संक्रातीनिमित्त खानापूर तालुक्मयातील असोगा, खानापूर, कुंभार्डा, नंदगड येथील तीर्थक्षेत्रावर विशेष पूजेचे आयोजन केले जाते. पूजा व दर्शनासाठी परिसरातील भाविक आवर्जुन उपस्थित असतात. यावषी मकर संक्राती मंगळवार दि. 14 रोजी व किक्रांती बुधवार दि. 15 रोजी होणार आहे.
असोगा येथील रामलिंगेश्वर मंदिर
असोगा येथील रामलिंगेश्वर मंदिरा शेजारी पाणी बऱ्यापैकी राहिल्याने अनेक भाविक मलप्रभा नदीपात्र स्नानासाठी आवर्जुन उपस्थित असतात. खानापूर शिवस्मारक सर्कलपासून असोगा गावापर्यंत बस व्यवस्था व खासगी वाहनांची सोय आहे.
मलप्रभा काठावरील पंचमुखी महादेव मंदिर
शहराच्या मलप्रभा नदीकाठावर संक्रातीनिमित्त स्नानाचा लाभ घेण्यासाठी भाविकांचा अधिक ओढा असतो. येथील पंचमुखी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच सुऊवात होते. अनेकजण मलप्रभा नदीत स्नान करताता.
नाथपंथीय हंडीभडंगनाथ मठ
तालुक्मयाच्या दक्षिण भागात कुंभार्डा गावाजवळ असलेल्या नाथपंथीय हंडीभडंगनाथ मठावर संक्रांतनिमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. खानापूर, धारवाड, हल्याळ, बैलहोंगल, जोयडा परिसरातील अनेक भाविक या मठावर आवर्जुन उपस्थित असतात.
संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळ
बालचमूंसह पालकही नंदगड येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधी स्थळाला संक्रातीनिमित्त भेट देतात.
हब्बनहट्टी स्वयंभू हनुमान मंदिर
मलप्रभा नदी पात्रालगत असलेल्या हब्बनहट्टी येथील स्वयंभू श्री हनुमान मंदिरात संक्रांतनिमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. खानापूरसह जांबोटी, बेळगाव परिसरातील भाविक उपस्थित राहतात. नदीपात्रातील आनंद लुटण्यासाठी व देवदर्शन घेण्यासाठी सहकुटुंब बरेचजण या ठिकाणी येतात. यावषी मलप्रभा नदीवर असणाऱ्या आठ ते दहा बंधाऱ्यावर फळ्या घालून पाणी अडविल्याने नदीत यावषी उत्तम पाणीसाठा झाला आहे. यामुळे असलेल्या शेतकऱ्यातून समाधान पसरले आहे मकर संक्रातीच्या निमित्ताने मलप्रभा नदीच्या पवित्र स्नानासाठी नेहमी गर्दी असते. यासाठी यावषीच्या खोलवर पाणी साठ्याच्या ठिकाणी दक्षता घेणे गरजेचे आहे. असोग्यापासून पारिश्वाडपर्यंत यावषी पुरेपूर पाणीसाठा झाला आहे. संक्रातीच्यानिमित्ताने परिश्वाड येथील नदीवर यात्रा भरते. तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा प्रेमाचा संदेश एकमेकांना देऊन उत्सव साजरा करतात.









