पिचकारी, टिमक्मया, रंगांच्या खरेदीला उधाण : शहर परिसरात आज जल्लोष पाहायला मिळणार
बेळगाव : धूलिवंदनच्या पूर्वसंध्येला बाजारात नागरिकांची खरेदीसाठी वर्दळ वाढली होती. विशेषत: पिचकारी, टिमक्मया आणि विविध रंगांची खरेदी झाली. त्यामुळे दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदाच्या धूलिवंदनासाठी बाजारात उलाढाल वाढली होती. विशेषत: बालचमू, पिचकारी आणि टिमक्मया तर तऊणाईने विविध रंग खरेदीला पसंती दिली. बाजारात पांढरे सदरे, कुर्ते, टोप्या आणि इतर पोशाखाला मागणी वाढली होती. त्याचबरोबर नैसर्गिक रंग आणि इतर पावडर कलरचीही अधिक प्रमाणात खरेदी झाली. बालचमूंनी पिचकारी, टिमक्मया आणि मास्कची खरेदी केली. त्याचबरोबर छोटा भीमचे चित्र असलेल्या साहित्य खरेदीला पसंती दिली. त्यामुळे गणपत गल्ली, माऊती गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, खडेबाजार, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी गर्दी वाढली होती. धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात रंग खरेदीला उधाण आले होते. मंगळवारी बाजारपेठ अर्धा दिवस बंद असल्याने अनेकांनी सोमवारीच खरेदीला पसंती दिली. मंगळवारी शहरासह उपनगरात आणि अनगोळ, टिळकवाडी, विजयनगर, हिंडलगा आदी भागात रंगोत्सव रंगणार आहे. त्यामुळे तऊणाईचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विविध भागात रंगोत्सवासाठी मंडप घालून त्यावर शॉवर बसविण्यात आले आहेत. ग्रामीण भागात पाच दिवसांनी म्हणजे रविवारी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. मात्र, शहरी भागात पारंपरिक पद्धतीने धूलिवंदनादिवशी रंगोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे आबालवृद्धांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
बाजारात रंग खरेदीला बहर
धूलिवंदनच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाजारात विविध रंगांची खरेदी वाढली होती. निळा, गुलाबी, हिरवा, लाल, राखाडी यासह साडी, दगडी, खडी कलरची खरेदी अधिक प्रमाणात झाली. त्यामुळे बाजारात रंग खरेदीला बहर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
तऊणाईचा आज जल्लोष
दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा धूलिवंदन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी तऊणाई सज्ज झाली आहे. त्यामुळे मंगळवारी शहर परिसरात तऊणाईचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी शॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी लुटला रंगोत्सवाचा आनंद

रंगोत्सवासाठी शहर सज्ज झाले आहे. मात्र, बालचमूला सोमवारपासूनच रंगोत्सवाचे वेध लागले. सोमवारी दुपारी शाळा सुटताच विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांवर रंगांची उधळण केली. अर्थातच शाळेत येतानाच त्यांनी याची तयारी केली होती. शाळा सुटताच घरी जाण्यासाठी आलेल्या रिक्षामामा आणि पालकांना थोडा वेळ थांबा, असे धिटाईने सांगून बालक विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत रंगपंचमी सोमवारीच साजरी केली. मंगळवारी शाळांना सुटी असल्याने मित्र भेटणार नाहीत, म्हणून हा रंगोत्सव सोमवारीच साजरा झाला. या बालचमुचा हर्षोल्हास पाहून रिक्षावाल्या मामांनीही त्यांच्या समवेत रंगोत्सवाचा आनंद लुटला. रिक्षामामांना रंग लावण्यासाठी बालचमूची एकच घाई सुरू होती. दरम्यान, वेगवेगळे मास्क घालून बालचमू आपल्या गल्लीमध्ये आनंदाने फिरत असतानाही पाहायला मिळाले.









