प्रतिनिधी
बांदा
बांदा येथिल प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिकी एकादशीला मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला.या सोहऴ्यात हजारो भाविकांनी श्री विठुरायाचे दर्शन घेतले .यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पहाटे पाच वाजता काकड आरतीने हा सोहऴा आरंभ झाला. त्यानंतर दर्शनास सुरवात झाली. सकाळपासुनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी वाजतगाजत उत्सवमुर्तीचे मंदिरात आगमन झाले. त्यानंतर श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन मंडळाच्या भजनसेवेचा कार्यक्रम झाला. 7 वाजता नित्य सायंआरती झाली. रात्रो श्रींचा पालखी प्रदक्षिणा सोहळा तसेच आजगांवकर दशावतार मंडळाच्या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहऴ्याचा लाभ घेतले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









