
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि तालुक्मयामध्ये अंगारकी संकष्टी श्रध्देने आचरण्यात आली. विघ्नहर्ता गजानन सर्व संकटे दूर करतो, नवसाला पावतो अशी श्रध्दा तमाम भाविकांमध्ये आहे. त्यामुळेच बेळगावमध्ये चन्नम्मा सर्कल, हिंडलगा गणपती, शहापूर खडेबाजार येथील सिध्दीविनायक मंदिर, शहापूर मार्केटमधील गणेश मंदिर, अनगोळ येथील स्वयंभू गणेश मंदिर, कपिलेश्वर येथील गणेश मंदिर, सरस्वतीनगर येथील गणेश मंदिर, कचेरी गल्ली येथील गणपती मंदिर येथे भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली.
मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, मंत्र पठण, आरती आदी विधी झाले. यानिमित्ताने अनेक भक्तांनी आपला नवस पूर्ण झाल्यानंतर संकल्पपुर्ती केली. त्यामुळे कोणी 21 तर कोणी 5 किंवा 7 नारळांचे तोरण बांधले. कोणी मोदकाचा नैवैद्य दाखविला.
यानिमित्ताने सर्व मंदिरांच्या प्रवेशव्दारांपाशी पूजा साहित्याची म्हणजेच फुले, दुर्वा, फळफळावळे साहित्य घेऊन विपेते थांबले होते. तसेच काही ठिकाणी फुगेवाले आणि खेळणी विपेतेही पहावयास मिळाले.
रात्री उशिरापर्यंत घेतले दर्शन
तालुक्मयातही अंगारक संकष्टी साजरी करण्यात आली. वेंगुर्ला मार्गावरील मार्कंडेय नदीच्या तिरावर असलेल्या गणेश मंदिरामध्ये अभिषेक व महापूजा झाली. सकाळपासून रात्री उशीरापर्यंत भाविकांनी मंदिरात येवून दर्शन घेतले. तसेच उचगावमधील मध्यवर्ती गणेश मंदिरामध्ये व छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.









