सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी मोती तलावात शुक्रवारी सकाळी नागरिकांना पुन्हा एकदा मगरीचे दर्शन झाले . सकाळचे कोवळे ऊन घेण्यासाठी ही मगर बाहेर पडली होती. नागरिकांचा गलबलाट सुरू झाल्यानंतर मगर पुन्हा पाण्यात गेली. दरम्यान सावंतवाडी मोती तलावात बऱ्याच दिवसांनी मगर दिसल्यामुळे येथील मगरींचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे .









