आयएएस अधिकारी टीना दाबी यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथील सरकारी जमिनीवर केलेल्या पाकिस्तानी हिंदू स्थलांतरितांची घरे पाडण्याचे आदेश जारी केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टिका होऊ लागली आहे. जैसलमेर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 4 किमी अंतरावर असलेल्या अमर सागर परिसरात राहणाऱ्या पाकिस्तानी स्थलांतरितांची घरे जैसलमेरचे जिल्हाधिकारी टिना दाबी यांनी जमिनदोस्त केली.
जैसलमेरच्या जिल्हाअधिकारी टिना दाबी यांनी आपल्या कारवाईत कच्च्या बांधकामाची 50 हून अधिक घरे जमिनदोस्त केली आहेत.
यामुळे 150 हून अधिक महिला, पुरुष आणि मुले उघड्यावर पडली आहेत. ही कारवाई करताना बुलडोझरचा वापर करण्यात आला. स्थलांतरित हिंदू नागरिकांनी टीना दाबी यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करून आपल्याला त्याच किंवा ईतरत्र ठिकाणी घरे बांधून पुनर्वसित करावे अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राजेंद्र राठोड यांनी पाकिस्तानी हिंदू स्थलांतरितांची घरे पाडणे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारचे ‘धृविकरणाचे राजकारण’ असल्याचे आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानातून आलेल्या हिंदू निर्वासितांची घरे बुलडोझरने पाडणे ही ‘काँग्रेस सरकारची क्रूरता असल्याचे म्हटले आहे.









