प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांची मुख्यमंत्र्याच्या निवेदनावर नाराजी
पणजी : भारताचे माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जे उद्गार काढले ते म्हणजे त्यांना शाखेतून मिळालेले प्रशिक्षण आहे. त्यामुळे त्यांच्या प्रमाणपत्राची कोणतीही गरज नाही, अशा कठोर शब्दातून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या संदेशात पाटकर यांनी म्हटले आहे, की पं. नेहरू यांचे राजकीय स्थान अजरामर आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या विचाराशक्तीच्याही पलिकडचे आहे. त्यांनी शाळेमध्ये इतिहास हा विषय शिकलेला आहे का ! याची खातरजमा करावी. त्यांनी अशी अभद्र निवेदने करण्यापेक्षा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर जास्त भर द्यावा, असा सल्लाही पाटकर यांनी मुखमंत्र्यांना दिला.









