पुणे / प्रतिनिधी :
एकाच इमारतीमध्ये असलेल्या व्हर्टिकल विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक निकष राज्य सरकारने जाहीर केले आहेत. त्यानुसार या विद्यापीठासाठी किमान 15 हजार चौरसमीटर बांधकाम असणारी स्वतंत्र इमारत उभारावी लागणार आहे. तसेच विद्यापीठासाठी इतर निकषही निश्चित केले आहेत. त्यामुळे राज्यातील व्हर्टिकल विद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली 2015 मध्ये द्विसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मुंबई शहर जिल्ह्यात स्वयं अर्थसहाय्यीत विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जमीन उपलब्ध नसेल तर न्यूयॉर्क, वॉशिंग्टन व तेलअविव या शहरांमध्ये व्हर्टिकल विद्यापीठ उभारलेले आहेत, त्याच धर्तीवर मुंबई शहर जिल्ह्यामध्ये अशा विद्यापीठांना परवानगी द्यावी, अशी शिफारस समितीने केली होती.
व्हर्टिकल विद्यापीठासाठीचे निकष :
– विद्यार्थी संख्या वाढल्यास वाढीव बांधकामासाठी वाव असावा
– अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्या व सोयीसुविधा असाव्यात
– विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची सुविधा असावी








