नवरात्रोत्सवात प्रत्येकाच्या घरी कडाकणी बनवली जाते.पण कडाकणीच्या प्रत्येकाच्या रेसिपी वेगवेगळ्या आहेत.कोणी साखरेची कडाकणी करतं तर कोणी गूळ घालून करतं. पण आज आपण एक वेगळी रेसिपी जाणून घेणार आहोत.जी तुम्हालाही नक्कीच आवडेल
साहित्य
१ किलो मैदा
१ किलो बेसन पीठ
पाऊण किलो गुळ
वेलदोडे
मीठ
पाणी
तेल
कृती
सर्वप्रथम गूळ बारीक चिरून कोमट पाण्यात भिजत ठेवावा.नंतर मैदयात चवीनुसार मीठ घालून पीठ मळून घ्या.पाण्यात गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये वेलदोड्याची बारीक पूड घालावी.आणि विरघळलेला गूळ बेसन पिठात घालून मळून घ्यावे. (पाण्यात संपूर्ण गूळ विरघळलेला असावा) यानंतर मैदयाच्या पिठाची छोटी वाटी करून पुरण पोळी प्रमाणे बेसन आणि गुळाचे सारण त्यात भरून घ्यावे .सारण भरून झाल्यानंतर हे गोळे लाटून घ्यावेत, यानंतर गॅस वर तेल गरम करत ठेवावे. तेल तापल्यानंतर मंद आचेवर कडाकणी टाळून घ्यावी.ही खुसखुशीत कडाकणी एकदा नक्की ट्राय करा.
Previous Articleक्रिएशन फाईन आर्ट्सच्या प्रदर्शनाला सुरुवात
Next Article गतिरोधकांसाठी चक्क शिक्षक रस्त्यावर उतरले









