लवकरच दिवाळीचं आगमन होणार आहे. त्यामुळे घराघरात फराळाची लगबग तर चालूच आहे पण बाजारातही फराळाचे अनेक स्टॉल्स लागले आहेत. यामध्ये फराळाचे नाना प्रकार पाहायला मिळत आहेत. याचप्रमाणे घरच्या घरी देखील चकली ,चिवडा,लाडू ,करंजी या नेहमीच्या खमंग फराळासोबतच एक वेगळा पदार्थ तुम्हीही ट्राय करून पाहू शकता.म्हणूनच आज जाणून घेऊयात खुसखुशीत चिरोट्याची ही खास रेसिपी.
साहित्य
मैदा- एक वाटी
रवा- दोन वाटी
तूप- अर्धी वाटी
पिठी साखर- दोन वाटी
दुध
मीठ
पाच ते सहा चमचे कॉर्नफ्लॉवर
तळण्यासाठी तेल किंवा तूप
कृती
सर्वात आधी एका वाटीत ४ चमचे तूप आणि कॉर्नफ्लॉवर एकजीव करुन बाजूला ठेवा.एका परातीमध्ये २ वाटी रवाआणि एक वाटी मैदा घ्या . त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. यानंतर सर्व पीठ एकत्र करुन त्यात अर्धी वाटी तुपाचे मोहन घाला आणि चांगले मिसळून घ्या. नंतर त्यामध्ये दुध घालून पीठ चांगले घट्टसर मळून घ्या. आणि 15-20 मिनिटांसाठी मिश्रण झाकून ठेवून द्या.१५ मिनिटांनी पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करा.आणि त्याच्या पातळ ३ पोळ्या लाटून घ्या. आता पोळपाटावर एक पोळी ठेवा त्यावर तुप-कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण पसरवून लावा मग त्यावर दुसरी पोळी ठेवा त्याला ही मिश्रण लावा आणि त्यावर तिसरी पोळी ठेवून त्यालाही मिश्रण लावून घ्या. यांनतर या एकावर एक ठेवलेल्या तिन्ही पोळ्यांचा एक घट्ट रोल बनवा.आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा. नंतर चाकूने रोलचे लहान-लहान तुकडे करा.या तुकड्यांच्या कडा दाबून घ्या आणि त्याला गरज असल्यास मैद्याचे पीठ लावा. आणि हलक्या हाताने लाटून घ्या.अशा प्रकारे सर्व चिरोटे लाटून घ्या.गॅसवर तेल किंवा तुपात हलका बदामी रंग येईपर्यंत तळून घ्या.तळलेले चिरोटे गार झाल्यावर पिठी साखरेमध्ये बुडवून घ्या.या दिवाळीला ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









