Matar kachori: बाहेर पावसाचं वातावरण आणि थंडी यामुळे काहीतरी चटपटीत खाण्याचा मोह होतो. अशावेळी भजी, बटाटा वडा, समोसा हे तेच तेच पदार्थ घरी केले जातात.
पण आज आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत. जी स्वादिष्ट आणि सोपी देखील आहे. चला तर मग आज जाणून घेऊयात मटार कचोरी कशी बनवतात ते…
साहित्य
दोन वाट्या मैदा
एक वाटी बारीक रवा
एक किलो मटार
थोडीशी कोथिंबीर
100 ग्रॅम सुकं खोबरं
अर्धा चमचा लाल तिखट
चार-पाच हिरव्या मिरच्या
एक चमचा हळद
एक चमचा गोडा मसाला
एक चमचा काळा मसाला
मीठ चवीनुसार
दोन चमचे लिंबाचा रस
अर्धा चमचा साखर
एक चमचा जिरे पावडर
एक चमचा धने पावडर
तेल
कृती
प्रथम एका परातीमध्ये दोन वाट्या मैदा घ्या. त्यात एक वाटी बारीक रवा व पाच ते सहा चमचे तेल व चवीपुरतं मीठ घालून घट्ट मळून घ्या आणि पीठ दोन ते तीन तास बाजूला ठेवा. नंतर मटार सोलून मिक्सरमधून थोडी जाडसर वाटून घ्या. त्यात चार-पाच हिरव्या मिरच्या बारीक करून घाला. नंतर कढईमधे तीन चार चमचे तेल घ्या ,तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी आणि जिरे घाला. त्यामध्येच भाजलेले खोबरे घालून थोडं परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर हळद, तिखट, काळा मसाला, गोडा मसाला, धने पावडर व जिरे पावडर घालून परता. परतल्यावर त्यात मटाराची भरड घाला व चांगले मिसळून घ्या. नंतर त्यात चवीपुरते मीठ व साखर घाला. आता सारण तयार आहे. यानंतर पिठाच्या गोल पुऱ्या लाटून त्यात मटार सारण घालून त्या बंद करून चपट्या गोल वडे बनवा. कढईमधे तेल गरम करून कचोरी सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या. खुसखुशीत मटार कचोरी चिंचेच्या किंवा पुदिनाच्या चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









