कडाकणीशिवाय नवरात्रोत्सव होतच नाही. दसऱ्यात प्रत्येकाच्या घरी कुरकुरीत कडाकणी केली जाते.त्याचबरोबर इतर गोडधोड पदार्थ देखील असतात. यामुळे अशावेळी म्हणावं तितकसं गोड खाऊ वाटतं नाही. म्हणूनच आज आपण तिखट कडाकणीची रेसिपी जाणून घेणार आहोत.चहासोबत देखील तिखट कुरकुरीत
आणि चविष्ट कडाकणी आपण स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात याची रेसिपी.
साहित्य
गव्हाचे पीठ – १ वाटी
मैदा – २ वाटी
हिंग – १ चमचा
लाल तिखट – दोन चमचे
हळद – १ चमचा
धने-जिरेपूड – १ चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
ओवा – १ चमचा
पाणी
तेल
मीठ
कृती
सर्वप्रथम एका परातीमध्ये २ वाट्या मैदा आणि एक वाटी गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये एक चमचा हिंग, दोन चमचे तिखट, एक चमचा हळद आणि धने जिरे पूड,एक चमचा ओवा,बारीक चिरलेली कोथिंबीर असे सर्व जिन्नस पिठामध्ये घालावेत. त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि २ चमचे तेल गरम करून घालावे.सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. यानंतर त्यामधे थोडे थोडे पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्यावे.आणि १५ मिनिटं झाकून ठेवावेत.यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून पातळ पुऱ्या लाटून घ्याव्यात.आणि तळून घ्याव्यात.कुसक्षित आणि कुरकुरीत कडकणी तुम्हाला ही आवडेल. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा.
Previous Articleभारतीय महिलांचा दुसरा विजय
Next Article भारत-द. आफ्रिका तिसरी टी-20 लढत आज









