सांगली :
आरटीईची प्रवेश प्रक्रिया दी पूर्णपणे ऑनलाईन म पारदर्शकपणे राबविली जाते. लॉटरी पद्धतीने प्रवेश पात्र लाभार्थी आणि प्रतीक्षा पापी शाळानिहाय घोषणा करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणताही नानगी हस्तक्षेप असणार नाही. त्यामुळे पालकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आमाइन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्य शासनाने आर्थिक दुर्वत आणि बचित पटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कापयानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत. पा जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येते. पा प्रवेश प्रक्रियेतून पहिली ते आठवीपीचे शिक्षण मोफत दिले जाते. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क राज्य सरकारमार्फत शाळांना प्रतिपूर्तीच्या माध्यमातून देण्यात येते.
जिल्ह्यात पंपा आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी २१८ शाळा पात्र ठरल्या आहेत. या शाळांमध्ये वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २ हजार ३८ जागा उपलब्ध आहेत. या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेशासाठी अर्ज करण्यास मातीता २७ जानेवारीपर्यंत आणि नंतर २ फेब्रुवारीपर्यंत मुफ्त देण्यात आली होती. या मुदतीत सुमारे ३ हजार ५० अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे प्रात झालेल्या अर्जातून लॉटरी पद्धतीने सोडत केली जाणार आहे. पुढील आठवडभात सोडत होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे होते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच कोणी गैरप्रकार करत असल्याच शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधाना असे आवाहन करण्यात आले आहे.








