शहर पोलीस ठाण्याच्या डी. बी पथकांची कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील खेड (ता.सातारा) येथील ट्रक्टरच्या शोरूममधून स्पेअर पार्ट व शाहूनगर येथील बंद घराच्या मजल्यावरचे ट्रकाचे स्पेअर पार्ट चोरणाऱया दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन चोरीचे गुन्हे उघड करण्यात शहर पोलीस ठाण्याच्या डी. बी पथकाला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खेड येथील ट्रक्टरच्या शोरूममधून शुक्रवारी रात्री ट्रक्टरच्या स्पेअर पार्ट चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच डी. बी पथकाने माहितीच्या आधारे एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुह्याच्या अनुशंगाने चौकशी केली. यावेळी त्याने स्पेअर पार्ट चोरी केल्याची कबुली देत पोलिसांनी पार्ट जप्त केले. या मुलांवर यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
शाहूनगर येथील एका बंद घरातील दुसऱया मजल्यावर ट्रकाचे स्पेअर पार्ट ठेवण्यात आले होते. दोन युवकांनी ते स्पेअर पार्ट चोरी केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. यावेळी एक अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात होता, मात्र एकजण तेथून पळून गेला होता. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुह्यात चोरी केलेल्या स्पेअर पार्ट पोलिसांनी जप्त केले आहेत. असा एकूण 48 हजार रूपये किंमतीचा ऐवज दोन्ही गुह्यात जप्त करण्यात आलेल्या आहेत अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपधीक्षक गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस निरीक्षक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, रविंद्र वाघमारे, संतोष कचरे, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, अर्चना कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.