जुना राजवाडा पोलिसांची कारवाई
कोल्हापूर प्रतिनिधी
फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हाणामारी प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी शिवाजी तरुण मंडळ व प्रॅक्टीस क्लबच्या 17 खेळाडूंविरोधात गुन्हे दाखल केले. यंदाच्या हंगामातील पहिलाच गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी हा वाद गंभीरपणे घेतला आहे. पोलिसांसमोर मारामारी, गर्दी, मारामारी अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजी तरुण मंडळाचे रोहन आडनाईक, योगेश कदम, संदेश कासार, ऋतुराज सुर्यवंशी, विक्रम शिंदे, संकेत साळोखे, मयुरेश चौगुले, करण रविंद्र चव्हाण बंदरे तर प्रॅक्टीस क्लबचे अर्जुन साळुखे, संकेत जाधव, सागर चिले, राहुल पाटील, सचिन गायकवाड, ओंकार जाधव, सागर पवार, आदित्य पाटील, अमित बीसवास यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.