कोल्हापूर: साळोखे नगर परिसरातील कोपर्डेकर हायस्कूल च्या समोर असणाऱ्या मैदानामध्ये तरुणाचा भोसकून खून करण्यात आला. संकेत पाटील (वय 20 रा. वाल्मिकी वसाहत परिसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.वाल्मिकी परिसरात अपंग वसाहत येथील संकेत पाटील हा तरुण सरनोबतवाडी मधील एका गॅरेजमध्ये कामाला आहे. शनिवारी रात्री कोपर्डेकर हायस्कूल च्या समोर असणाऱ्या मैदानामध्ये त्याचा भोकसून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
Previous Articleसाळोखे नगर परिसरात तरुणाचा भोसकून खून
Next Article ‘कब तक छिपोगो गोहातीमे; आना ही पडेगा चौपाटी में…’









