संभाजीनगर येथील बिअरबारमधील घटना, चौघांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर : बारमध्ये दारु पित असताना किरकोळ कारणातून झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. यामध्ये अनिकेत अनंत देसाई (वय 36 मुळ रा. शिंदे अंगण, संभाजीनगर सध्या रा. डीपीरोड औंध जि. पुणे) हे जखमी झाले.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पिल्या कांबळे, धिरज शर्मा, वृषभ उर्फ मगर साळोखे, सुयश वाडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर येथील समाधान बारमध्ये ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अनिकेत देसाई हे संभाजीनगर येथील समाधान बारमध्ये मद्यप्राशन करत बसले होते. त्याच्या समोरच्या टेबलवर पिल्या कांबळे, धिरज शर्मा, वृषभ उर्फ मगर साळोखे, सुयश वाडके हे चौघेजण दारुपित बसले होते. यावेळी अनिकेत व संशयीतांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद सुरु झाला.
यातून संशयीतांनी अनिकेतला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच अनिकेतच्या डोक्यात बिअरची व सोड्याची बाटली फोडली. तसेच काचेचा ग्लासही फेकून मारला. काही वेळातच नागरीकांनी हा वाद मिटविला. यामध्ये अनिकेत जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली.








