पुणे / प्रतिनिधी :
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने एका तरुणावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक कोंढरे (रा. अंधेरी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संजय हरिदास वाघमारे (वय 37, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार 14 जून रोजी अप्पर बिबवेवाडी याठिकाणी घडलेला आहे. आरोपी दीपक कोंढरे याने मागील भांडणाच्या कुरापती काढून तक्रारदार यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून तक्रारदार यांना आरोपीने शिवीगाळ केली. याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








