कोल्हापूर :
शहरातील एका नामवंत महाविद्यालयाच्या प्राध्यापकाची फॉरेक्स टेडिंगमध्ये गुंतवणूक केली. तर गुंतवणूकीवर प्रत्येक महिन्याला सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांचा मुलगा दीपक सर्जेराव पाटील (रा. खडकाव गल्ली, कळे, ता. पन्हाळा), त्याचा पाहुणा युवराज सदाशिव पाटील (रा. कोलोली, ता. पन्हाळा) आणि अविनाश मारुती राठोड (मूळ रा. बरगाववाडी, कार्वे, ता. जिंतूर, जि. परभणी परभणी, सध्या रा. शाहूपुरी, कोल्हापूर) या तिघांनी संगनमत करुन, 25 लाख 90 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधी शाहुपूरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद किशोर तानाजी जाधव (मुळ रा. भक्तवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा, सध्या रा. हिम्मत बहाद्दूर इनक्लेव्ह, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी दिली आहे.
पोलिसांनी या तिघा संशयितांचा शोध सुऊ केला आहे. याचदम्यान या तिघांना आपल्याविरोधी गुन्हा दाखल झाल्याची चाहुल लागताच, त्यानी राहत्या घरातून धूम ठोकली आहे. या तिघांनी कोणा–कोणाची फसवणूक केली आहे. त्या गुंतवणूकदारांनी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन शाहूपुरी पोलिसांनी केले आहे.
फिर्यादी किशोर जाधव यांची संशयित आरोपी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांचा मुलगा दीपक पाटील आणि युवराज पाटील या दोघाबरोबर सचिन पाटील य मित्राच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीतून या दोघा संशयितांनी आम्ही फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीमध्ये तज्ञ असून, पर्ल टीएम ग्रुप या नावाने फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये लोकांकडून रक्कम घेवून, त्यांना जादा परतावा मिळवून देतो असे सांगितले. त्या विश्वास ठेवून किशोर जाधव यांनी आपल्याकडील 15 लाख ऊपये आणि भाऊ नितीन जाधव यांच्याकडून 15 लाख ऊपये उसणवार घेवून, 30 लाख ऊपये कंपनीच्या शहरातील खानविलकर पेट्रोल पंपानजीकच्या कार्यालयात संशयीत दिपक पाटील, युवराज पाटील, अविनाश राठोड याच्याकडे भरले. त्यानंतर त्यांना संशयितांनी कोणताच परतावा दिला नाही. याबाबत त्यांनी त्याच्याकडे संपर्क साधला असताना उडवा–उडवीची उत्तर देवू लागले.
त्यानंतर फिर्यादीने तिघा संशयिताकडे गुंतवणूक केलेल्या पैसाबाबत तगादा लावला. त्यावेळी त्यांना 4 लाख 10 हजार ऊपये किंमतीची उंचगाव येथील जमीन लिहून दिली आहे. तसेच 15 लाखाचा धनादेश दिला. तो धनादेश बँकेत भरला. पण तो न भरता परत आला. त्यामुळे फिर्यादी किशोर जाधव यांनी या तिघा संशयिताविरोधी 25 लाख 90 हजार ऊपयांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.
- कळे परिसरात खळबळ
फसवणूकीचा गुन्हा दाखल झालेला जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांचा मुलगा दीपक पाटील आणि युवराज पाटील हे दोघे पाहुणे आहेत. या दोघांना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांचे कळे परिसरात चांगले वलय आहे. त्यामुळे त्याच्याविरोधी गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी गेल्या सात–आठ महिन्यांपासून त्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर गुन्हा दाखल होताच कळे परिसरात एकच खळबळ उडाली.








