स्कॉर्पिओ अपघातात युवकाचा मृत्यू
वृत्तसंस्था/ कानपूर
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे राहणाऱ्या राजेश मिश्रा नामक एका ग्राहकाने जरीब चौकी येथील महिंद्रा शोरूममधून आपल्या मुलासाठी स्कॉर्पिओ गाडी घेतली होती. काही दिवसांनी दाट धुक्मयामुळे महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन दुभाजकावर आदळले. अपघातादरम्यान कारच्या एअरबॅग न उघडल्यामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे. या अपघातप्रकरणी महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्यासह 13 जणांविऊद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
2020 मध्ये त्यांनी जरीब चौकी येथील श्री तिऊपती ऑटो एजन्सीकडून 17 लाख ऊपयांची स्कॉर्पिओ कार खरेदी केली होती. 14 जानेवारी 2022 रोजी त्यांचा मुलगा अपूर्व मिश्रा लखनौहून कानपूरला येत असताना दाट धुक्मयामुळे त्यांची कार दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. या दुर्घटनेत अपूर्वचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी सीट बेल्ट घातला असूनही कारच्या एअरबॅग उघडल्या नाहीत. त्यामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करत राजेश मिश्रा (60) यांनी पोलिसात सदर गुन्हा नोंदवला आहे.









