पुणे / वार्ताहर :
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक आणि यूटय़ूबवर अश्लील कमेंट केल्याप्रकरणी सात जणांवर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिकमधील सभेत खा. सुप्रिया सुळे बोलत असताना पाच जणांनी रुपाली चाकणकर यांच्या युटयूबवर अश्लील कमेंट केल्या होत्या. तर सहा जुलैला रुपाली चाकणकर या फेसबुकवर लाईव्ह असताना दोघांनी आक्षेपार्ह कमेंट केली होती. याप्रकरणी युवराज विलास चव्हाण (वय 31, रा. धायरी, पुणे) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 7 जणांवर 354 ए, 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.